वरवेली (गणेश किर्वे) - विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर २०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली येथे करण्यात येणार आहे. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी गुहागर तालुका विज्ञान मंडळाच्या वतीने विशेष नियोजन सभेचे आयोजन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथेकरण्यात आले होते. सदरचे नियोजन गटशिक्षणाधिकारी आर एच गळवे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सारिका शिंदे, केंद्रप्रमुख महेंद्र वळवी, केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचे मुख्याध्यापक एम. ए. थरकार, गुहागर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मंगेश गोरविले, पंचायत समितीचे चपलवार, गायत्री गनगुटकर, गुहागर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरविंद पालकर, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष जी एन पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले.
सभेच्या प्रारंभी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष जी. एन. पाटील, सुदेश कदम यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कल्पकतेला चालना देणे आणि विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करणे ही विज्ञान प्रदर्शनाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी नमूद केले. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, विज्ञानप्रेमी आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प, प्रतिकृती, संशोधनात्मक उपक्रम आणि नावीन्यपूर्ण संकल्पना यांना विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. विज्ञान प्रदर्शनाचे कामकाज सुलभ, शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सभेमध्ये विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील समित्यांचा समावेश करण्यात आला. १. मुख्य सनियंत्रण समिती, २. निमंत्रण समिती, ३. नोंदणी समिती, ४. स्वागत समिती, ५. भोजन समिती, ६. वाहतूक व्यवस्थापन समिती, ७. प्रश्नमंच समिती, ८. उद्घाटन व समारोप समिती, ९. प्रमाणपत्र लेखन समिती, १०. प्रसिद्धी व लेखन समिती. प्रत्येक समितीवर जबाबदाऱ्या निश्चित करून प्रदर्शनाच्या पूर्वतयारीपासून ते समारोपापर्यंतचे नियोजन करण्यात आले. प्रदर्शनस्थळाची व्यवस्था, सहभागी शाळांची नोंदणी, पाहुण्यांचे स्वागत, भोजन व वाहतूक व्यवस्था, विविध स्पर्धांचे आयोजन, प्रमाणपत्रांचे वितरण तसेच प्रसिद्धी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सामूहिक प्रयत्नांतून विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात आपापली मते मांडली. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या माध्यमातून नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणवत्ता सर्वांसमोर यावी, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली. तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने होणारे हे प्रदर्शन गुहागर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याबरोबरच त्यांच्यातील संशोधक, संशोधकवृत्ती आणि नवकल्पनांना प्रोत्साहन मिळणार आहे. सभेच्या शेवटी विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, जिज्ञासेला आणि वैज्ञानिक प्रतिभेला नवी दिशा देणारे गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शन तळवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होण्यासाठी तालुका विज्ञान मंडळ व शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.