loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञान प्रबोधिनीच्या जैवविविधता विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण

देवगड (प्रतिनिधी) - शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथील गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात ज्ञान प्रबोधिनी युवक विभागाच्या देवगड विज्ञान दलातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘जैवविविधता विज्ञान प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दैनंदिन विज्ञान, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणिशास्त्र, पर्यावरण व जैवविविधता अशा विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग व प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी केवळ प्रयोग मांडले नाहीत, तर त्यांच्या मागील वैज्ञानिक संकल्पना उपस्थितांना समजावून सांगत विज्ञानातील कुतूहल आणि निरीक्षणशक्तीचे दर्शन घडविले. देवेन कुबल याने ‘अल्गल पेपर मेकिंग’ तसेच ड्रॉसोफिला व बेडकाचे जीवनचक्र सादर केले. उपस्थितांनाशेवाळापासून कागद तयार करण्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. जतिन बांदकर याने नैसर्गिक घटकांपासून पी एच इंडिकेटर तयार करून आम्ल व आम्लारी तपासण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वनस्पतीशास्त्राशी संबंधित विविध प्रयोगांमध्ये कढाण्यातील श्वसन (बीन रेस्पय्रेशन), परासरण क्रिया (ऑस्मासिस), पानातील प्रकाशसंश्लेषण व आयोडीन चाचणी, बाष्पोत्सर्जन तसेच विविध प्रकाशातील वनस्पतींची वाढ यांसारख्या विषयांवर अध्याय शिंदे , श्लोक पाटील , संकल्प जिसरड व अतिश रुमडे या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागात अखिलेश ठाकूर याने डी एन ए एक्स्ट्रॅक्शन करून दाखविले. वेदांत माने पाटील, वेदांत धुरी, राज कोयघाडी आणि अयान सौदागर यांनी अनुक्रमे बॅक्टेरियल डायव्हर्सिटी, प्लांट इलेक्ट्रोफिजियोलॉजी, फंगल नेटवर्क आणि रूट मायक्रोबायोम यांसारख्या विषयांद्वारे सूक्ष्मजीवांचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यावरण व जैवविविधता विभागात अधिराज बलवान याने बायोफ्लुरोसेन्स, तर हर्षराज करंगुटकर याने समुद्रातील शेवाळापासून रंगद्रव्ये मिळविण्याची पद्धत सादर केली. सुमेध पेडणेकर, पीयूष गुरव, यश ताम्हाणकर व अमान खान यांनी प्राण्यांमधील विविधता, पानांच्या नसांची रचना तसेच नमुने जतन करण्याच्या विविध पद्धतींची माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

दैनंदिन जीवनातील विज्ञानाची सांगड घालत श्रेयंक पुरळकर याने सूक्ष्मदर्शकाखालील सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करून दाखविले, तर रोहित चौधरी याने व्हिटॅमिन ‘सी’ चाचणी (डीसी पीआयपी चाचणी) सुरक्षेच्या नियमांचे पालन करून सादर केली. या प्रदर्शनाला स्थानीय समितीच्या पदाधिकारी सौ. अर्चना नेने तसेच विलास रूमडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक केले. प्रदर्शनाचे आयोजन व मार्गदर्शन सुयोग कडू, राहुल सारंग आणि निश्चय तेली यांनी केले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले हे विज्ञान प्रदर्शन अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजून घेण्याची तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg