loader
Breaking News
Breaking News
Foto

राजेश गायकर यांची भाजपच्या खालापूर पश्चिम मंडळ संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

​पनवेल : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेअंतर्गत राजेश गायकर यांची खालापूर पश्चिम नवीन मंडळाच्या संपर्कप्रमुख पदी अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​राजेश गायकर यांना पक्ष संघटनेचा दीर्घ अनुभव असून त्यांनी यापूर्वी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सलग सहा वर्षे यशस्वीपणे काम पाहिले आहे. यासोबतच त्यांनी संपर्कप्रमुख म्हणून खालापूर, खारघर, कर्जत आणि पनवेल (दक्षिण) अशा विविध तालुक्यात संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा खालापूर पश्चिम मंडळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नव्या नियुक्तीबद्दल राजेश गायकर यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि विविध स्तरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg