loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील गोपाळ कृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणात शाखाधिकाऱ्याला जामीन मंजूर

खेड : दापोली येथील श्री गोपाळ कृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक अपहार प्रकरणात अटक करण्यात आलेले पतसंस्थेचे शाखाधिकारी भिकू रामचंद्र मोरे यांना खेड येथील मे. जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅड. अश्विन भोसले यांनी केलेला कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अश्विन शाह भोसले यांनी खेड येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने बचाव पक्षाचा कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरत २० नोव्हेंबर रोजी जामीन अर्ज मंजूर केला. त्यानुसार २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीची मुक्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या जामीन मंजुरीमुळे दापोलीतील गोपाळ कृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक अपहार प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, लेखा परीक्षणातून समोर आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आणि कथित बनावट कागदपत्रांचा तपास पुढे कोणत्या दिशेने जातो, याकडे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg