loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात रंगणार महिलांचे नमन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी या मडळामार्फत महिला कलाकारांना एकत्र करून त्यांना व्यासपीठ देण्यासाठी माऊली महिला नमन मंडळाची स्थापना करून महिला कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले. या नमन मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे मुबंईतील दादर येथील शिवाजी मंदिर येथे जावूनही प्रयोग केला आहे. नुकताच या नमनाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोगही साजरा झाला आणि आता ५१ वा प्रयोग स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे रविवार दि १५/११/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होत आहे. या नमनामध्ये नमनसम्राट यशवंत वाकडे यानी लिहीलेला पौराणिक गण व नटखट गौळण, रावणनृत्य असे व विविध कला प्रकार सादर होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये निर्माता साईनाथ नागवेकर, विशेष सहाय्य शरद गोळपकर, दादा वाडेकर, वासुदेव वाघे, सागर मायंगडे, महिला अध्यक्षा प्रेरणा विलणकर, नेपथ्य संतोष उर्फ बावा आग्रे व संगीतसाथ परशुराम घवाळी, साई घवाळी, पार्तेज आंबेरकर करत आहेत. गायिका आकांक्षा वायंगणकर असून पूनम गोळपकर, वेदा शेट्ये, रेश्मा शिदे, विनया काळप, तन्वी नागवेकर, समिक्षा वालम, शिवानी मयेकर, पूर्वा चव्हाण, आदिती पवार, निरजा जोगळे, कियारा नागवेकर आदी कलाकार आपल्या भूमिका साकरत आहेत. या प्रयोगासाठी या महिलांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन सचिव वासुदेव वाघे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg