loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात रत्नागिरी नगरपालिकेची अव्वल कामगिरी, राज्यात चौथा क्रमांक पटकावला

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ या प्रतिष्ठित मोहिमेमध्ये रत्नागिरी नगरपालिकेने अव्वल कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. शहराचे सौंदर्य, कचरा व्यवस्थापनाचे सुसूत्र नियोजन आणि नागरिकांची स्वच्छताप्रियता याच्या जोरावर रत्नागिरीने राज्यपातळीवर हे मानाचे स्थान मिळविले आहे. या ऐतिहासिक यशाचा दैदिप्यमान सोहळा येत्या ११ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात रंगणार असून देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नगरपालिकेचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीचा हा सर्वोच्च गौरव स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपाध्यक्ष समीर तिवरेकर आणि मुख्याधिकारी वैभव गारवे हे सर्व मिळून राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारतील. गेल्या काही वर्षांपासून नगरपालिकेने शहरात राबवलेली विविध स्वच्छता अभियाने, सुका आणि ओला कचरा वेगळा करण्याचे केलेले प्रभावी नियोजन तसेच स्वच्छता कर्मचार्‍यांचे अहोरात्र कष्ट यामुळेच हे यश शक्य झाले आहे.

टाईम्स स्पेशल

यामध्ये रत्नागिरीतील सुजाण नागरिकांनी दिलेली मोलाची साथ अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. राज्यस्तरावर चौथ्या क्रमांकावर मोहर उमटवून रत्नागिरीने इतर नगरपालिकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. दिल्लीत होणार्‍या या गौरव सोहळ्यामुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे. हे यश केवळ नगरपालिकेचे नसून प्रत्येक रत्नागिरीकराच्या स्वच्छतेप्रती असलेल्या बांधिलकीचे फलित आहे, अशी भावना संपूर्ण परिसरातून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg