वेळणेश्वर (उमेश शिंदे) - सेवा संकल्प अभियान व जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियाना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत वेळणेश्वर-वाडदई ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने वेळणेश्वर सागरी किनारा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी व शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सागरी किनारा स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानात न्यू इंग्लिश अँड ज्युनिअर कॉलेज वेळणेश्वर, पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं १, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ यांनी प्रमुख सहभाग घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्राताई ठाकूर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, गटविकास अधिकारी प्रमोद शिंदे तसेच पंचायत समितीचे विविध अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
सागरी किनार्यावर आढळणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या व इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ समुद्रकिनारा, निरोगी पर्यावरण आणि प्लास्टिकमुक्त परिसर याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. तसेच उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या नेत्राताई ठाकूर, उपसभापती निलेश सुर्वे, यांनी आपल्या मनोगतातून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार्या सेवा संकल्प अभियान व २९ सप्टेंबर रोजी जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियानाविषयी माहिती देऊन स्वच्छता मोहिमेत राबविण्यात येणार्या वेगवेगळ्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. शालेय विद्यार्थ्यांनी सागरी स्वच्छता विषयक घोषणा देऊन सागरी किनार पट्टीची स्वच्छता केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीएमश्री आदर्श प्रशालेचे नोडल शिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी केले. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनातून स्वच्छता अभियानाचा उद्देश, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि सामूहिक सहभागाचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला. ‘स्वच्छ किनारा, सुंदर वेळणेश्वर आणि निरोगी पर्यावरण’ या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानातून सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.