loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब मालवणतर्फे ऍम्बुलन्स चालकांचा विशेष सन्मान

मालवण (प्रतिनिधी) - सेवा सप्ताहाचे औचित्य साधून मालवणातील अवधूत परुळेकर, गणेश कुडाळकर, यश मालवणकर, सदा मयेकर आणि दत्तात्रय मयेकर या पाच ऍम्बुलन्स चालकांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याबरोबरच गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ऍम्बुलन्स चालकांचा लायन्स क्लब ऑफ मालवणच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला. रुग्णवाहिका चालक हे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणारे महत्त्वाचे घटक आहेत. रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास लागणारा प्रत्येक क्षण रुग्णासाठी महत्त्वाचा असताना रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ मालवणने हा सन्मान सोहळा आयोजित केला. लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापार्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी लायन्स क्लबच्या सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, गणेश प्रभुलकर, बाळू अंधारी, उमेश शिरोडकर, राजा शंकरदास, रुजारिओ पिंटो, अंजली आचरेकर, रूपा कांदळगांवकर यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg