loader
Breaking News
Breaking News
Foto

शालेय शिक्षणमंत्री ना. दादा भुसे यांची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट

पनवेल (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दादा भुसे यांनी ०९ ऑक्टो. (शुक्रवार) रोजी खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, सचिव डॉ.एस.टी. गडदे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, आधुनिक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविणे, या अनुषंगाने यावेळी विचारविनिमय करण्यात आला. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत होणारे बदल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा तसेच शाळांच्या माध्यमातून सक्षम, सुसंस्कृत आणि गुणवंत पिढी घडविण्याचे महत्त्व यावरही चर्चा झाली. दर्जेदार शिक्षण आणि आणि दृष्टीने सातत्याने सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg