loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे पोलिस आयुक्तांचा व्हॉट्स ॲप हॅक ,ठाण्यात एकच खळबळ ; २० अश्लील चित्रफिती प्रसारित !

ठाणे दी.१७ (प्रतिनिधी) : सोशल मिडीयावर मोबाईल क्रमांकाद्वारे व्हॉट्स ॲप आणि अनेक खाजगी अकाऊंट हॅक झाल्याच्या घडणा वारंवार घडताहेत मंगळवारी (दी.१७ ) सायंकाळी चक्क ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल क्रमांक सायबर गुन्हेगारांकडून हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने ठाण्यात पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली.सदरचे हॅक करण्याचे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे सर्व नागरिकांनी याची गांभिर्याने नोंद घेवुन सहकार्य करावे. अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाचे, निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी,वरिष्ठ पोलीस, शैलेश साळवी यांनी दिली आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, यांच्या Whatsapp खात्याचा अनधिकृत ताबा (Hacking) घेतल्याचे निदर्शनास आले आहे. सदर खात्याच्या Whatsapp Status वर काही आक्षेपार्ह व अश्लील व्हिडीओ प्रसारीत होत आहेत. तरी सर्व नागरीकांना पोलिस आयुक्तालयाकडून जाहीर सूचना प्रसारित करण्यात आल्या मोबाईल हॅक करून सदर Whatsapp Status वरील कोणत्याही व्हिडीओवर विश्वास ठेवु नये. अशा व्हिडीओचे प्रसारण, डाउनलोड किंवा फॉरवर्ड करू नये. सदर खात्यावरून येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद संदेशाना किंवा लिंकला प्रतिसाद देवु नये. या घटनेबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत. अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत

टाइम्स स्पेशल

ठाणे पोलिस आयुक्त त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरील स्टेट्सवर टप्प्याटप्प्याने सुमारे २० अश्लील चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या.आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरील स्टेट्सवर अचानक अश्लील चित्रफिती दिसू लागल्या. या चित्रफिती टप्प्याटप्प्याने प्रसारित केल्या जात होत्या. अवघ्या काही मिनीटांमध्ये सुमारे २० चित्रफिती स्टेट्सवर प्रसारित करण्यात आल्या. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. मंगळवारी सायंकाळी ४ वाजून ४६ मिनीटांच्या सुमारास हा प्रकार घडला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस वरील अश्लील चित्रफिती डिलीट करण्यात पोलिसांना यश आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg