loader
Breaking News
Breaking News
Foto

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी युवासेनेचा पुढाकार; डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनला १० लाखांचा धनादेश सुपूर्द!

डोंबिवली (शंकर जाधव) - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने युवासेना कल्याण लोकसभेच्या वतीने १० लाख रुपयांचा धनादेश डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनला सुपूर्द करण्यात आला. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी युवासेनेने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या आर्थिक मदतीच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमात निखील वालेकर, कामेश जाधव, युवराज पाटील, तेजस सांगळे, अभिषेक धोंढे, शेखर साकपळ, दत्ता गोसावी भाऊ, भूषण यशवंतराव, रोशन पांडे, सतीश मुंबरकर, प्रथमेश पाटील, सूरज मराठे, ऋषिकेश पाटील, ओंकारी आदव, समीर चालके, एजाज खान, ओंकार चव्हाण, विवेक पाटील, तेजस देवकाते, विनायक पाटील, सुशील पवार, सुरजीत पंजाबी, अजय गायकवाड, अमित देशमुख, ओंकार तांबे आणि महेश म्हात्रे यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg