वरवेली (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रात्रीच्या ड्युटीच्या नियोजनावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एकही अन्य कर्मचारी सोबत नसताना एका महिला आरोग्य कर्मचारी यांना रात्रीची ड्युटी देण्यात येत असल्याचा आरोप होत असून, तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर जंगलमय भागात असून, परिसरात जंगली प्राण्यांचा वावर असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी एका महिला कर्मचार्याने एकट्याने संपूर्ण रात्र रुग्णालयात ड्युटी कशी करायची?, असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे रात्रीच्या ड्युटीसाठी साधा शिपाईदेखील उपलब्ध नसल्याची चर्चा आहे. त्यातच रुग्णालयाची वीज गेल्यास पर्यायी प्रकाशासाठी इन्व्हर्टरची पुरेशी सोय नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे महिला कर्मचार्याच्या सुरक्षिततेबरोबरच रुग्णांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे संबंधित महिला कर्मचारी ड्युटीवर आल्यानंतर रुग्णालयात अन्य कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याचे पाहून परत गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर तिलाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचारी परत गेली असेल, तर परिस्थितीची जबाबदारी निश्चित करण्याऐवजी नोटीस बजावण्याची घाई का? असा सवाल उपस्थित होत आहे.
आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी रात्रीच्या वेळी किमान आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळे चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रात्रीच्या ड्युटीचे नियोजन, महिला कर्मचार्यांची सुरक्षितता आणि उपलब्ध सुविधांची संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. महिला कर्मचार्याच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? आणि रात्रीच्या ड्युटीला एकटी महिला कर्मचारीच का...? या प्रश्नांची उत्तरे आरोग्य विभाग देणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.