loader
Breaking News
Breaking News
Foto

बिजघर नं.१ शाळेने बनवली शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती

बिजघर - शिवकालीन गडकिल्ल्यांची माहिती मुलांना मिळावी शिवाजी महाराजांचा पराक्रम मुलांना समजावा या हेतूने बिजघर नं. १ शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती बनवली. हा किल्ला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी उस्फुर्त उपस्थिती नोंदवली. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते निवृत्त इन्स्पेक्टर विश्वासराव भोसले निवृत्त कॅप्टन राजाराम राव भोसले, सातगाव विभागाचे सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष राजेंद्र भिकाजीराव भोसले, गावचे मानकरी सुनीलराव भोसले, प्रतिष्ठित नागरिक उमेश राजाराम भोसले, अध्यक्षा आकांक्षा भगवान जंगम, माजी अध्यक्ष भगवान जंगम, पोलीस पाटील प्राची मर्चंडे सुरेखा पवार संजना मर्चंडे अनिता खोपकर सुजाता खोपकर मनीषा खोपकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यासाठी संदीप घाणेकर, शैलेश पराडकर व शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर व सर्व मुलांनी मेहनत घेतली. सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले यांनी त्याचप्रमाणे राष्ट्रपती पुरस्कार विजेते विश्वासराव भोसले यांनी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल शाळेचे भरभरून कौतुक केले. त्याचप्रमाणे शिवकालीन किल्ला प्रतिकृती बनवून शिवरायांच्या इतिहासाला उजाळा दिल्याबद्दल शाळेचे विशेष कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg