loader
Breaking News
Breaking News
Foto

मोदी सरकारचा मोठा निर्णय; तीन पेन्शन योजनांतून इंदिरा गांधींचे नाव हटवले

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र, काही उप-योजनांच्या नामकरणातील बदल सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, केंद्राने आपला प्रमुख कार्यक्रम 'राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम' (NSAP) पुढील पाच वर्षांसाठी, म्हणजेच २०३१ पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

1 .इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना-पंतप्रधान वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना 2. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना-पंतप्रधान विधवा निवृत्तीवेतन योजना 3. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्तीवेतन योजना-पंतप्रधान दिव्यांगजन निवृत्तीवेतन योजना हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने ग्रामीण विकास क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (MGNREGA) चे नामकरण बदलून 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)' असे केले आहे.

टाइम्स स्पेशल

सरकारने या योजनेचे नामकरण 'प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना' (Prime Minister's Social Assistance Scheme) असे केले आहे. यासोबतच, या योजनेच्या तीन प्रमुख उप-योजनांमधून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे.सरकारच्या निर्णयानुसार, खालील तीन विद्यमान उप-योजनांची नावे बदलण्यात आली आहेत:

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg