loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील पाच जिल्ह्यांत लोकसहभागातून १२ हजारांहून अधिक वनराई बंधारे

संगलट (इक्बाल जमादार) - दरवर्षी मुसळधार पाऊस पडूनही डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे वाहून समुद्राला जाऊन मिळणारे पाणी अडवण्यासाठी यंदा संपूर्ण कोकण विभागात 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या मोहिमेने लोकचळवळीचे रूप धारण केले आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, कृषी व वन विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या उत्स्फूर्त श्रमदानातून आतापर्यंत १२ हजारांहून अधिक वनराई आणि विजय बंधारे उभारले गेले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याने या मोहिमेत मोठी आघाडी घेतली असून, येथे १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 'मिशन बंधारे' अंतर्गत एकाच दिवशी हजारो बंधाऱ्यांची उभारणी करत आतापर्यंत ६,५०१ हून अधिक बंधारे पूर्ण झाले आहेत. रत्नागिरीमध्ये पारंपरिक वनराई बंधाऱ्यांसोबतच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'विजय बंधारे' तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करून पाणी गळती पूर्णपणे रोखली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सप्टेंबर अखेर अणाव येथून या विशेष जलसंवर्धन मोहिमेला सुरुवात झाली असून, सर्व तालुक्यांतील ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागातून आतापर्यंत ४,५०० हून अधिक बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. उरलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गावागावांत अखंड श्रमदान सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, तळा, महाड, पोलादपूर आणि सुधागड यांसारख्या टंचाईग्रस्त तालुक्यांतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने विशेष लोकचळवळ उभी केली आहे. प्रत्येक गावात ५ ते १० हजार बंधारे बांधण्याच्या नियोजनातून पहिल्याच टप्प्यात अवघ्या पाच दिवसांत २०० हून अधिक बंधारे पूर्ण करण्यात आले असून, या वेगवान कार्यपद्धतीची राज्य मंत्रिमंडळातही विशेष दखल घेण्यात आली आहे. रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी या बंधारे उभारणीच्या कामची प्रत्यक्ष पहाणी करुन ग्रामस्थांचा प्रशंसा केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg