loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष, मराठा समाजाचे नेते शशिकांत तुकाराम सावंत उर्फ एस टी सावंत (80) यांचे रविवार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. एस. टी. सावंत यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून काम करताना विविध विकासकामांना चालना दिली. तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन व सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एस. टी. सावंत हे एस टी काका या नावाने जिल्हाभरात परिचित होते. मूळ फोंडाघाट येथील असले तरी गेली कित्येक वर्षे ते जाणवली येथे स्थायिक झाले होते. दोन वेळा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. संघटना पातळीवर त्यांचे मोठे कार्य होते. शिवसेनेसाठी त्यांनी अत्यंत कठीण काळात आपले भरीव असे योगदान दिले होते. सामाजिक कार्य ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन सुना, नातवंडे अशा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दुपारी तीन वाजल्यानंतर त्यांच्या जाणवली येथील राहत्या घरातून निघणार आहे. जाणवली येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg