loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कर्जत संपर्कप्रमुखपदी सौ. सुचिता खोल यांची नियुक्ती - सदानंदराव भोसले

कर्जत | प्रतिनिधी: मराठा क्रांती स्वराज्य राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष अभिजित दरेकर राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सौ अस्मिता आत्माराम साळुंखे यांनी संघटनेच्या कर्जत संपर्कप्रमुखपदी कर्जत नगरपालिकेच्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती सौ. सुचिता देवेंद्र खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कर्जत तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सौ. सुचिता खोत या नगरसेविका म्हणून स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांशी जोडलेल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा सभापती म्हणून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग संघटनेच्या कार्यविस्तारासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.कर्जत तालुक्यात संघटनेचे विचार आणि उद्दिष्टे जनतेपर्यंत पोहोचविणे, नागरिकांशी संपर्क वाढविणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि सामाजिक प्रश्नांवर पाठपुरावा करणे, अशी जबाबदारी संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यावर असेल.मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबविणे आणि जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सौ. सुचिता देवेंद्र खोत यांच्या नियुक्तीमुळे कर्जत परिसरातील संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कर्जत संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ. सुचिता देवेंद्र खोत यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन करत शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या. राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे रायगड जिल्हा अध्यक्ष विलास मोतीराम चाळके मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड खालापूर तालुका सल्लागार ॲड सचिन चाळके मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ आरती बबनराव दळवी कोकण प्रदेश युवा अध्यक्ष साहिल संतोष चव्हाण यांच्या सह शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg