loader
Breaking News
Breaking News
Foto

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत असोंड आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना किराणा साहित्याची भेट

खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खेड व खेड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. खेड यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा आश्रमशाळा, असोंड येथे भेट देऊन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी किराणा सामान व इतर खाद्योपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. मुलांच्या जडण-घडणीत, वाढ आणि विकासात पोषणाचा महत्वाचा वाटा असतो. सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी भावी पिढी सुदृढ असणे आवश्यक आहे, तरच पुढची पिढी सक्षम घडेल आणि ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, असे विद्यार्थी व पालक यांना संबोधित करताना सहाय्यक निबंधक खेड योगिता मुरडे यांनी आपले विचार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कोकण विभागीय पतसंस्था फेडरेशनचे संचालक संदिप तांबे, कार्याध्यक्ष अभिनय महाजन, उपाध्यक्ष संदिप मोदी, सदस्य सौ. श्रावणी आंबेडे, सदस्य सौ. स्नेहा हळदे, दिनेश पाटील - मुख्य कार्यकारी अधिकारी - जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. असोंड तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg