loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा रुग्णालयात गरिब रुग्णांना भेडसावणार्‍या प्रश्नांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रशासनाला विचारला जाब

रत्नागिरी - आज जिल्हा रुग्णालयात गोरगरिब जनतेला भेडसावणार्‍या प्रश्नाांच आणि अडचणींचा सामना करावा लागतो, याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संतप्त शिवसैनिकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचाराला. गेली अनेक दिवस बंद असलेले सिटी स्कॅन मशीन केव्हा चालू करताय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अपघात विभागात शिकावू डॉक्टर रुग्णांना उर्मट भाषेत बोलतात असेही प्रशासनाला सांगण्यात आले. सुरक्षारक्षकांची कमतरता असून औषध विभागाला फलक लावणे आवश्यक आहे. नवीन स्थलांतरीत केलेल्या अपघातविभागाचे दिशादर्शक फलक अजून लावण्यात आलेले नाहीत, तसेच पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोरगरीब रूग्णांना दैनंदिन भेडसावत असणार्‍या समस्यांचा पाढा रुग्णालय प्रशासनाच्या समोर मांडण्यात आला. रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी शिवसैनिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि उपाययोजनांबाबत लवकरच प्रयत्न करु असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेनेचे तालुका समन्वयक शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख मयू पाटील, महिला उपजिल्हा प्रमुख रशीदा गोदड, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला शहरप्रमुख सेजल बोराटे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता रामानंद यांची भेट घेतली. यावेळी शहरातील आणि तालुक्यातील विभागप्रमुख, नगरसेवक उपस्थित होते. प्रसंगी शिवसेना उप तालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण, सुभाष रहाटे, विभागप्रमुख किरण तोडणकर, राजाराम रहाटे, साजिद पावसकर, तन्वीर मुजावर, अमित खडसोडे, प्रसन्न ऊर्फ बंड्या सुर्वे, सुफियान जयगडकर, नगरसेवक अमित विलणकर, केतन शेटे, जेष्ठ शिवसैनिक उप विभागप्रमुख दिलावर गोदड, राजू सुर्वे, बाबू चव्हाण, शहानवाज काझी, पल्लवी गुरव, भाटकर आदी शिवसैनिक उपस्थित होते. वरील समस्यांचे लवकर निवारण नाही झाले तर शिवसेना पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. रुग्णालय अधिष्ठाता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व मागण्या लवकरच पूर्ण करतो, असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg