loader
Breaking News
Breaking News
Foto

रामपेठ येथे श्रीराम मंदिर सभागृह भूमिपूजन सोहळा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - रामपेठ येथील श्रीराम मंदिर सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सभागृहाच्या उभारणीमुळे ग्रामस्थांच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार असून, गावाच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संजय गांधी अध्यक्ष विवेक शेरे, कैलास चोचे, मिलिंद भिंगार्डे, पोलीस पाटील अंगराज कोळवणकर, अशोक शेटे, नाना कोळवणकर, विलास शेटे, कैलास शेटे, डॉ. अमित ताठरे, उदय संसारे यांच्यासह इतर ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने आमदार शेखर निकम यांचे आभार मानण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यामुळे रामपेठ गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg