loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी

मुंबई - शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या संदर्भात सवोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरु असून आज पुन्हा महत्वपूर्ण सुनावणी दुपारी २ वाजल्यानंतर होणार आहे. सरन्यायाधीशांच्या पीठासमोर होणार्‍या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सुनावणी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटाच्यावतीने वकिल मनिंदर सिंह युक्तीवाद सादर करतील. यापूर्वी सादर झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील निरज किशन कौल यांनी शिंदे गटाची बाजू मांडली होती. त्यांचा युक्तीवाद पूर्ण झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विधीमंडळातील बहुमताचा निकष अद्याप वैध असल्याचा युक्तीवाद गेल्या सुनावणी दरम्यान करण्यात आला होता. आमदारांच्या अपात्रतेचा अंतिम निर्णय होण्यापूर्वी त्यांना अपात्र ठरविता येणार नाही. असेही शिंदे गटातर्फे सुनावणीत सांगण्यात आले होते. आजच्या सुनावणीमध्ये काय घडते? ते कळून येईलच पण प्रकरणाच्या निकालावर महाराष्ट्राच्या राजकाराणे सारे गणित ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg