loader
Breaking News
Breaking News
Foto

कंत्राटी नोकर भरती बंद करा - युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे खेडमध्ये जनआंदोलन

खेड (प्रतिनिधी) : राज्य सरकारने सुरू केलेली कंत्राटी, मानधन, तात्पुरती आणि आऊटसोर्सिंग पद्धतीची नोकर भरती तात्काळ बंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खेड येथे जनआंदोलन करण्यात आले. "वर्षानुवर्ष सेवा... तरीही रोजगाराची हमी नाही!" असा आक्रोश करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आंदोलनात कंत्राटी पद्धतीवर काम करणारे शेकडो कर्मचारी, कामगार आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बॅनरवर स्पष्ट म्हटले आहे की, याच पद्धतीत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी-कामगारांच्या हक्कासाठी हे जनआंदोलन आहे. संघटनेचे नेते बाळा खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी निवेदन वाचून दाखवण्यात आले आणि आपल्या प्रमुख मागण्या शासन दरबारी मांडण्यात आल्या. या आंदोलनामुळे खेड शहरात चर्चेला उधाण आले असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg