loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारी परिसरात वारंवार होणार्‍या अपघाताकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, २५ नोव्हेंबर रोजी उद्धव बाळासाहेबत ठाकरे पक्षाचे तीव्र रास्तारोको

लांजा (संजय साळवी) - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंजणारी परिसरात वारंवार होणारे अपघात, त्याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व बेजबाबदारपणा याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंजणारी येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील कित्येक वर्षांपासून दिरंगाई पद्धतीने सुरू असून सदर कामाबाबत मनमानीपणा, बेजबाबदारपणा दिसून येत असून कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. या निकृष्ट कामामुळे आंजणारी परिसरात सातत्याने अपघात होत असून मागील काही दिवसांत दिवसाआड अपघात झालेले असून मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान, जीवितहानी व प्रवाशांचे विनाकारण आर्थिक नुकसान झालेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचार्‍यांना देखील येथील अपघातामुळे जीव गमावून बसावे लागले आहे. तथापि याबाबत संबंधित प्रशासनाकडून गांभीर्यपूर्वक दखल न घेता केवळ मनमानीपणे थातूरमातूर पद्धतीने उपाययोजना केल्याचा आभास निर्माण केला जात आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सुधारणा न होता अपघातांची मालिका सुरूच आहे. या प्रशासनाच्या मुजोर, गलथान व बेजबाबदार कार्यपद्धतीबाबत जाब विचारण्यासाठी बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंजणारी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांच्या उपस्थितीत तीव्र रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असून याद्वारे होणार्‍या सर्व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख युवराज हांदे, शहरप्रमुख मोहन तोडकरी, माजी उपसभापती सुभाष रामाणे, उपविभागप्रमुख शांताराम गुरव, अल्लाऊद्दीन नेवरेकर, बाबा धावणे, भालचंद्र लाड, अक्षय कुरुप, मंगेश आंबेकर, बाळकृष्ण गुजर, शाखाप्रमुख किरण बेर्डे, शिवाजी भालेकर, पांचाळ आदि शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg