loader
Breaking News
Breaking News
Foto

किसान बँक स्टाफ सोसायटीच्या अध्यक्षपदी जितेंद्र साळवी बिनविरोध

रत्नागिरी, - रत्नागिरी जिल्ह्यातील पगारदार नोकरांची ‘किसान बँक स्टाफ सोसायटीच्या अध्यक्षपदी जितेंद्र जयवंत साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही संस्था रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची मातृ संस्था मानली जाते. जितेंद्र साळवी हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असून या संस्थेमध्ये त्यांनी तब्बल १७ वर्षे लिपिक म्हणूनही सेवा बजावलेली आहे. त्यासोबतच को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, रत्नागिरीचे ते जनरल सेक्रेटरी म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी आणि सी. पी. साळवी यांच्यासमवेत ते १९९५ पासून संघटनेत सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी २०१५ मध्ये युनियनचे कोषाध्यक्ष आणि २०२४ मध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पतसंस्थेत सुमारे ४३० सभासद आहेत. पतसंस्थेत ३६ कोटी रुपयांच्या ठेवी असून ३५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. १७ सदस्यांचे संचालक मंडळ असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदी साळवी यांची झालेली निवड कौतुकास्पद मानली जात आहे. मालगुंड गावचे रहिवासी असलेले साळवी हे मालगुंड येथील श्री चंडिका देवी ग्रामदेवतेच्या मंदिरात ८ वर्षे खजिनदार आणि २ वर्षे अध्यक्ष म्हणून यशस्वी काम पाहिले आहे. त्यांच्या या निवडीमागे को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी यांचा मोठा वाटा आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg