loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड वेरळ कांगवई जोड रस्त्याची दुरवस्था; निद्रिस्त जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग कधी येणार?

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील वेरळ ते दापोली तालुक्यातील कांगवई या जोड रस्त्याची दुरवस्था ही या भागातील ग्रामस्थ, शेतकरी आणि वाहनचालकांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. मागणी सलग तीन वर्ष पावसाळ्यात रस्त्यावरील डांबर उखडल्यामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळ्यात तर त्यात चिखल आणि पाण्याचे डबके साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वेरळ मार्गे कांगवईकडे जाणा-या मार्गावर अपघातांचे प्रमाण खुपच वाढले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे वाहने घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे एसटी सेवा आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून सार्वजनिक वाहतूक (लालपरी) बंद पडण्याची नामुष्की ओढवली आहे. तर खाजगी वाहने चालवणे कठीण झाले आहे, ज्यामुळे वेरळ आणि कांगवई परिसरातील विद्यार्थ्यांची व नोकरदारांची मोठी कोंडी होत आहे. रुग्णांना किंवा गरोदर मातांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा खाजगी वाहन वेळेवर मिळण्यात आणि पोहोचण्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

टाईम्स स्पेशल

वेरळ कांगवई हा जोड रस्ता दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यातील गावांना जोडणारा वाहतुकिच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा रस्ता असून या मार्गावरील मंडणगड तालुक्यातील वेरळ, दहींबे, उन्हवरे, पालवणी तर दापोली तालुक्यातील कांगवई, वेळवी, विरसई, भोमडी डौली गावांकडे जाणार्‍या या मार्गामुळे येथील लोकांचा सुखकर प्रवास होण्यासाठी रस्त्याची सुधारणा करुन रस्ता वाहतूक योग्य करावा, अशी मागणी महेंद्र मुर्चावडे, सामाजिक कार्यकर्ता, वेरळ यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg