loader
Breaking News
Breaking News
Foto

रोह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जाहीर निषेध

Roha News: काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध करताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्या वरून बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेचा आक्रमक झाले आहेत. रोहा अष्टमी नगर परिषद समोरील चौकात रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद! उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो! बाळासाहेबांचा अवमान करणाऱ्यांचा निषेध असो!शायना एनसी यांचा निषेध असो! आवाज कोणाचा? शिवसेनेचा! ताकद कोणाची? निष्ठावंत शिवसैनिकांची!५० खोके, एकदम ओके! शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी!जोरात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी अस्मितेचा विषय असल्याची भावना शिवसेनेकांनी व्यक्त केली. यावेळी शायना एन सी यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शायना एनसी यांच्यावर कारवाई करून हकलपट्टी करावी अशी मागणी रोहा तालुका शिवसैनिकांनी केली आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg