loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री भैरवनाथ देवस्थान चिंचघर खेड येथे नवरात्र उत्सव निमित्त कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खेड (चिंचघर) : शिवसेना उपनेते तथा आमदार संजय वसंतराव कदम यांच्या प्रेरणेने व श्री भैरवनाथ देवस्थान चिंचघर, खेड यांच्या वतीने नवरात्र उत्सव २०२६ निमित्त भैरवनाथ मंदिर परिसरात भव्य कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात घेतला. शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना, पशुसंवर्धनाबाबत मार्गदर्शन याची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शुभप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून खेड पंचायत समिती सभापती डॉ. अफिया पालेकर , उपसभापती सुनिल मोरे, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, पंचायत समिती सदस्य नम्रता तांबट, पंचायत समिती सदस्य समीक्षा महाडे, लोटे ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत चाळके तसेच कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg