loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरवली बुद्रुक येथील वृद्ध महिलेल्या खून प्रकरणात अटक असलेल्या प्रमोद खेडेकरला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी रामगाव परिसरात वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित प्रमोद खेडेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील वेरवली बुद्रुक लाडवाडी रामगाव येथे १९ ऑक्टोबर रोजी चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून झाल्याचे उघडीस आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली होती. यापूर्वी २७ ऑक्टोबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तपासासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली होती. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी एका फायनान्स कंपनीतून चोरीस गेलेल्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या असा सुमारे १२ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg