loader
Breaking News
Breaking News
Foto

२० ऑक्टोबर रोजी नावडी संगमेश्वर येथील श्री साई व गजानन महाराज मंदिराचा रौप्यमहोत्सव

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर नावडी येथील श्री साई व गजानन महाराज मंदिराची स्थापना १९९७/९८ मध्ये झाली असून चालू वर्षी २५ वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने मंदिराचा रौप्य महोत्सव कार्यक्रम मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात व मोठ्या भक्ती भावाने विधीवत संपन्न होणार आहे. रौप्य महोत्सवानिमित्त मंगळवार सकाळी ८ वाजता अभिषेक व विधिवत पूजा, दुपारी १२ वाजता आरती, भजन, पालखी प्रदक्षिणा, व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी या रौप्य महोत्सवातील विधिवत कार्यक्रमांचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भूषण सुर्वे, तुषार शिवलकर, रमेश झगडे, अशोक रहाटे, वेलचंद भांड, संदीप रहाटे, जनार्दन शिरगावकर, मंदार शिवलकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg