loader
Breaking News
Breaking News
Foto

'रंगानुभूती सन्मान २०२६' कणकवलीच्या वामन पंडित यांना जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा "रंगानुभूती सन्मान २०२६" यावर्षी कणकवलीच्या वामन पंडित यांना जाहीर झाला आहे. गतवर्षी पासून या पुरस्काराची सुरुवात झाली असून गेल्यावर्षी तो फिल्म ॲण्ड टेलीव्हीजन इन्स्टीट्यूट पुणेचे माजी डीन प्रा. समर नखाते यांना प्रदान करण्यात आला होता. शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजता ग. दी. माडगुळकर नाट्यगृह, प्राधिकरण (निगडी) येथे तो पंडित यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ₹ २५०००/- असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग' हा प्रयोग कला महोत्सव २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या दरम्यान सलग चार दिवस आयोजित केला आहे. त्यात महाराष्ट्रासह कलकत्ता, केरळ, आसाम, दिल्ली आणि ओरिसामधील नामवंत संस्थांची नाटके आमंत्रित केली गेली आहेत. याच महोत्सवात वामन पंडित यांचा 'अगा... मी जगमय झालो' हा कविता अभिवाचनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये कविश्रेष्ठ नारायण सुर्वेच्या समग्र कवितांचा आढावा घेऊन निवडक २० कविता वामन पंडित सादर करतात. हा महोत्सव दररोज सकाळी ९ ते रात्रौ १० या वेळेत आयोजिला आहे. रसिकांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg