loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांचा गौरव

वरवेली (वार्ताहर) - नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाइन आणि वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'आपले सरकार' उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या कामगिरीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल गुहागर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांचा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. आपले सरकार' पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या अर्जावर वेळेत कार्यवाही व्हावी आणि ऑनलाइन सेवांचा प्रभावी वापर वाढावा, यासाठी प्रशांत पाटील यांनी जबाबदारीने काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत वरिष्ठ स्तरावरून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या प्रभावी कामकाजामुळे जिल्ह्याच्या कामगिरीला राज्यस्तरावर विशेष स्थान मिळाले. त्यामध्ये प्रशांत पाटील यांच्या योगदानाचाही समावेश आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रशांत पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. नागरिकाभिमुख सेवा देताना अशीच कार्यक्षमता, तत्परता आणि जबाबदारी कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg