loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळीनिमित्त अलसफा वेल्फेअर फाउंडेशन व शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या वतीने खेड नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना स्नेहभेट!

खेड : दीपावली हा आनंद, प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. याच सणाचे औचित्य साधून अलसफा वेल्फेअर फाउंडेशन, अल्पसंख्याक शिवसेना खेड आणि अल्पसंख्याक युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी तसेच शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक यांना दिवाळीनिमित्त स्नेहपूर्वक भेटवस्तू देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमातून सामाजिक सलोखा, परस्पर स्नेह आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून समाजातील माणसांना एकमेकांशी जोडण्याचे आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याचे माध्यम आहेत, ही भावना या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

खेड शहराच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध जपत भविष्यातही सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सहकार्य करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg