loader
Breaking News
Breaking News
Foto

डोंबिवली जवळील दावडी गावाजवळ छठपूजेदरम्यान तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास यश

डोंबिवली - डोंबिवलीजवळील दावडी येथील तलावात २४ वर्षीय तरुण बुडाल्याची घटना रविवार १५ तारखेला सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाचे जवानांची सायंकाळपासून तलावात शोध कार्य सुरु होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी साडे सात वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या तरुणाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. जुगनू कश्यप असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. जुगनू हा कुटुंबासमवेत तलावाच्या ठिकाणी छठपूजेसाठी आला होता. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तो बुडत असल्याचे निदर्शनास पडताच तलावाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अन्य भाविकांनी याची माहिती स्थानिक मानपाडा पोलिस आणि डोंबिवली अग्निशमन केंद्राला दिली. अग्निशमन जवान आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg