loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनवी पुलाजवळ चौपदरीकरणाच्या काँक्रिटीकरणाला आतापासूनच खड्डे!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर परिसरात अत्यंत संथगतीने सुरू असतानाच, आता माभळे येथील सोनवी पुलादरम्यान करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाला आतापासूनच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे महामार्गाचे काम रखडलेले असताना दुसरीकडे नव्याने करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाची अशी अवस्था झाल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या खड्ड्यांमुळे एकेरी वाहतूक मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर परिसरात चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी कामाचा वेग मंदावलेला असून वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच सोनवी पुलादरम्यान माभळे येथे चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाला अल्पावधीतच खड्डे पडू लागल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

सोनवी पुलादरम्यान सध्या एका मार्गावरूनच वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वारांचा तोल जाण्याची, तसेच समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता आहे. विशेषतः एकेरी मार्गावर वाहनांची वर्दळ असताना खड्डे चुकवण्यासाठी अचानक वाहन वळवावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg