संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ परिसरातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या पुलामुळे वाणीवाडी, बाजारपेठ आणि समर्थनगर परिसरातील नागरिकांची गेल्या तब्बल ७० वर्षांपासूनची मोठी गैरसोय दूर झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कडवई वाणीवाडी, बाजारपेठ आणि समर्थनगर येथील नागरिकांची स्मशानभूमी नदीच्या पलीकडे असल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती. दुःखाच्या प्रसंगीही नदी ओलांडण्याचे आव्हान नागरिकांसमोर उभे राहत होते. त्यातच स्मशानभूमीच्या जागेवरून निर्माण झालेला वादही अनेक वर्षे प्रलंबित होता. मात्र, तीन वर्षांपूर्वी हा वाद मिटला आणि कै. नजीर जुवळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्मशानभूमीसाठी आवश्यक असलेली तीन गुंठे जागा विनामोबदला उपलब्ध करून दिली. जागेचा प्रश्न सुटला असला, तरी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याचा गंभीर प्रश्न कायम होता.
या समस्येचे विदारक वास्तव प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर पुलाचे काम पूर्ण झाले असून नुकतेच आमदार शेखर निकम यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देणे आणि उपलब्ध निधीतून आवश्यक त्या मूलभूत सुविधा निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. स्मशानभूमीसाठी तीन गुंठे जागा विनामूल्य उपलब्ध करून देणारे कै. नजीर जुवळे आणि त्यांच्या परिवाराच्या सामाजिक योगदानाबद्दल यावेळी विशेष समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच पुलापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या नसीमा खान, झिनत खांचे, लतीफ खांचे, दिलनवाझ खोत आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही आभार मानण्यात आले.
विशेष म्हणजे, या विकासकामात हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांनी दाखविलेली एकजूट आणि परस्पर सहकार्य हे सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. सामाजिक बांधिलकीला धर्माच्या सीमा नसतात, याची प्रचिती या कामातून आल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या लोकार्पण सोहळ्याला कडवईचे गावकर श्रीपत ओकटे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, माजी बांधकाम सभापती राजन कापडी, माजी नगरसेविका फैरोज मोडक, माजी प्रशासक दत्ताराम ओकटे, जमाते मुस्लिमचे चेअरमन सिकंदर जुवळे, हनुमान मंडळाचे अध्यक्ष बापू चव्हाण, सचिव सिकंदर कापडी, वरदान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण प्रसादे, अमित ताठरे, सादिक काझी, राहील जुवळे, संदेश सागवेकर, ठेकेदार मयूर भिंगारडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सात दशके प्रलंबित असलेली समस्या अखेर मार्गी लागली! दुःखाच्या प्रसंगी नदी ओलांडण्याची वेळ आता येणार नाही, हीच या पुलाची खरी फलश्रुती ठरणार आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.