loader
Breaking News
Breaking News
Foto

विजय तांबडकर निसर्गोपचार गौरव सन्मान -२०२६ पुरस्काराने सन्मानित

कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर) बुलडाणा येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व एजीएमए आणि योग निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुरुड नांदगाव येथील विजय चंद्रकांत तांबडकर यांना मान्यवरांच्या हस्ते निसर्गोपचार गौरव सन्मान -२०२६ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. "मिशन विजय" अंतर्गत क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा उमटविणारे मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर यांना मे महिन्यात"एस.एम.इ.आंतरराष्ट्रीय पुरस्कार -२०२६" ने सन्मानित करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सांस्कृतिक,सामाजिक,क्रीडा,आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच क्रीडा आणि आरोग्य असा दुहेरी संगम करून नवीन पिढीला याचं महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक वर्षे सेवा देणारे उपचारक व कराटेपट्टू मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर यांना बुलडाणा येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते निसर्गोपचार गौरव सन्मान -२०२६ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी विजय तांबडकर यांनी आपल्या सौभाग्यवती सुनंदा यांच्यासमवेत हा पुरस्कार स्वीकारला.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कराटे प्रेमी, चाहते,आप्तेष्ट,मित्रपरिवाराकडून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg