loader
Breaking News
Breaking News
Foto

मावळंगे, शिवधामापूर, व करजुवे गाव भेट व दुष्काळ आढावा सभा संपन्न, जि.प.सदस्य सुशिल भायजे यांचे आयोजन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर‌ या जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य सुशील भायजे यांनी या आपल्या मतदार संघात गाव भेट व दुष्काळ परिस्थितीचा आढावा सभेसाठी दौरा निश्चित केल्याप्रमाणे मावळंगे (आंबेट) शिवधामापूर, करजुवे आदी गावात प्रत्यक्ष उपस्थितींने सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत प्रत्येक गावातील नदी, ओढे, नाले यावर तात्काळ बंधारे बांधण्यात यावेत, तसेच आवश्यक तेथील गाळ उपसा करा, काही गरज व समस्या असतील मी जि.प.सदस्य म्हणून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. कारण या वर्षीचा दुष्काळ हा सन् १९७२ पेक्षा महाभयानक असून आता पासूनच पाण्याची बचत व साठा करुया, कारण एप्रिल, मे महिन्यात पाण्यासाठी बिकट परिस्थिती उद्भवू शकेल, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या गावा, गावात चांगले नियोजन करून आपण सामोरे जाऊया.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोरोना सारख्या महमारीत आपण सगळे जण सहकार्याने व समन्वयाने वागलो त्याप्रमाणें आताही या दुष्काळी परिस्थितीत काळजी घेऊनएकमेकास मदतीचा हात देऊन व पाण्याचा वापर अगदी काटकसरीने करावा.शेतीचे पंचनामे तात्काळ करा असे आवाहन व मार्गदर्शन जि.प.सदस्य सुशील भायजे यांनी सभेत उपस्थितीतांना केले. तसेच उपस्थित पाणीपुरवठा, आरोग्य खाते प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, पो. पाटील, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, व इतर सर्व कर्मचारी वर्गाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

या वेळी पं. स. सदस्य महेश जड्यार, सरपंच प्रकाश वीर, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल मोरे, पो.पा.भाई मोरे, उपसरपंच मनोहर पाष्टे, आंबव सरपंच शेखर उकार्डे, मंडळ अधिकारी करंबेळे, तलाठी धुरी, कृषी सहाय्यक श्रद्धा टाकळे, प्रशासक रतन देसाई, शिवधामापूरचे ग्राम वि.अधि.चाळके, तलाठी तांबिटकर, सुबोध चव्हाण, शैलेश चव्हाण, आत्माराम जाधव, विश्वास चव्हाण, प्रमिला ग मते, सुरेश गायकर, तसेच करजुवेतील सुभाष नलावडे, संतोष डावल, उपसरपंच श्रीकांत नलावडे, संध्या बने, अजय चांदिवडे, प्रशांत विचारे, पांडुरंग येलोंडे, शिक्षक पारधी, बाचीम गावकर, दीपक डावल, तलाठी शेंडगे, समीर नलावडे, केळकर, रघुनाथ गुरव, रमेश गवत डे, कल्पेश डावल, आदी तिन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg