loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतीच्या पाण्यासाठी बोअरवेलमध्ये बसवलेला शेतीपंप, केबल आणि पाण्याच्या पाईपसह चोरुन नेल्याची कोळपेत घटना

वैभववाडी (प्रतिनिधी) - शेतीच्या पाण्यासाठी बोअरवेलमध्ये बसविलेला शेती पंप, त्याला जोडलेली केबल आणि पाण्याचा पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना कोळपे-बौद्धवाडी येथे घडली आहे. या चोरीत शेतकर्‍याचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मनोज राजाराम कांबळे (वय ४३, रा. कोळपे तांबळवाडी, ता. वैभववाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली तक्रारीवरून वैभववाडी पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कांबळे यांची कोळपे बौद्धवाडी येथील माळावर शेती आहे. शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी २०१६ मध्ये बोअरवेल खोदली होती. या बोअरवेलमध्ये पंप बसविण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही दिवसांपूर्वी पंपामध्ये बिघाड झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी त्यांनी दुरुस्ती करणारा तंत्रज्ञ याच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तंत्रज्ञ अक्षय शामराव बोडके (रा. निगवे भुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हे अन्य तीन जणांसह कांबळे यांच्या शेतात आले. त्यांनी बोअरवेलमधील पंप बाहेर काढून दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंप पुन्हा बोअरवेलमध्ये बसवण्यात आला. पंपाच्या दुरुस्ती नंतर कांबळे यांनी पंप सुरू करून रात्री आठच्या सुमारास तो बंदही केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी (ता.१३) सकाळी साडेसहाच्या सुमारास कांबळे शेतात गेले. पंप सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला; मात्र स्टर्टर सुरू होत नव्हता. त्यामुळे त्यांनी बोअरवेलजवळ जाऊन पाहणी केली असता पाण्याची काळी पाइप आणि दोरी कापलेली दिसून आली.

टाईम्स स्पेशल

बोअरवेलमध्ये सोडलेली पाण्याची पाइप, पंपाला बांधलेली दोरी तसेच पंप आणि त्याची केबल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पंप आणि साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी गावचे पोलीस पाटील आदित्य कांबळे यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधितांशी संपर्क साधून बोअरवेलची पाहणी करण्यात आली. मात्र, पंपासह अन्य साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत सुमारे दहा हजार रुपये किमतीचा पंप, केबल आणि पाण्याची पाइप चोरीला गेल्याचे कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून वैभववाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg