loader
Breaking News
Breaking News
Foto

जगदीश कदम स्मृती लेख-लेखन स्पर्धेत श्रीकांत निवळकर प्रथम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड-पेठदेव यांच्या वतीने लांजा तालुक्यातील ज्ञानी, निर्भीड व सामाजिक भान जपणारे दिवंगत पत्रकार स्व. जगदीश कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित खुल्या लेख-लेखन स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत ‘शिवरायांचे स्वराज्य आणि आजची युवा पिढी’, ‘कोकणातील तरुणांचे वाढते स्थलांतर’ तसेच ‘फेक न्यूज आणि सोशल मीडिया : सत्य, समाज आणि पत्रकारितेपुढील आव्हाने’ या विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. सामाजिक वास्तव, युवा पिढीसमोरील आव्हाने, कोकणातील स्थलांतराची समस्या आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचे विविध पैलू लेखातून मांडण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत श्रीकांत मोहन निवळकर, मु. पो. कात्रोळी (कुंभारवाडी), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अविनाश अनंत काळे, मु. पो. गोळप, ता. जि. रत्नागिरी यांनी द्वितीय, तर राधा ऋषिकेश बेर्डे, मु. पो. भांबेड (बेर्डेवाडी), ता. लांजा, जि. रत्नागिरी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक युवराज बंडोपंत माळवी, मु. पो. राजापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांना मिळाले.

टाईम्स स्पेशल

यावेळी जिल्हा परिषद सदस्या विनिता गांगण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्व. जगदीश कदम यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे स्मरण करताना सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे लिहिणाऱ्या नव्या पिढीतील लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्या या उपक्रमातून वाचन, लेखन, वैचारिक अभिव्यक्ती आणि सामाजिक जाणीव यांना चालना मिळत असून स्व. जगदीश कदम यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg