loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्रावरील दुष्काळी संकटामुळे वाढदिवस साजरा करणार नाही, विनायक निकम यांची घोषणा; खर्च दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देणार

खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रावर ओढवलेल्या आस्मानी संकट दुष्काळामुळे मी माझा स्वतःचा वाढदिवस साजरा करणार नसल्याची घोषणा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक वामन निकम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. निकम यांचा वाढदिवस येत्या मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी आहे. दरवर्षी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र यावर्षी महाराष्ट्रावर पडलेला दुष्काळ, पाण्याचे प्रश्न, गुरांना चाऱ्याचे प्रश्न यामुळे शेतकरी, सर्वसामान्य माणूस व युवक बेरोजगारांवर सन १९७२ च्या दुष्काळाप्रमाणे परिस्थिती ओढवलेली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागामध्ये काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न व गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न अतिगंभीर झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने यावर्षीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसासाठी होणारा छोटासा खर्च दुष्काळग्रस्त भागांना मदत म्हणून देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही बॅनरबाजी, केक, पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg