ठाणे (प्रतिनिधी) : दिवाळी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कारागृह विभागांतर्गत ठाणे मध्यवर्ती कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी मेळावा - कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन व विक्री 2026' चे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या विशेष कार्यक्रमास कारागृह अधीक्षक राणी राजाराम भोसले आणि इतर सहकारी अधिकारी देखील उपस्थित होते. कारागृहातील कारखाना विभाग, सुतारकाम, यंत्रमाग, शिवणकाम आणि बेकरी विभागातील बंद्यांनी आपल्या कौशलयातून व मेहनतीतून ही उत्पादने तयार केली आहेत. यंदाच्या प्रदर्शनाचे सर्वात मोठे आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक उत्पादनावर एक क्यूआर कोड (QR Code) लावण्यात आला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर संबंधित वस्तूची प्रत्यक्ष निर्मिती कैद्यांनी कशी केली, याचा व्हिडिओ मोबाईलवर पाहता येतो. महाराष्ट्रात प्रथमच ठाणे कारागृहाने हा अनोखा उपक्रम सुरू केला असून, याद्वारे नागरिकांना कारागृहातील प्रशासकीय कामाची आणि उपक्रमांची माहिती मिळत आहे.
कारागृहातील सुतारकाम विभागातून सागाच्या लाकडापासून बनवलेली सुबक बैलगाडी, लाकडी फर्निचर, आकर्षक मंदिर आणि विविध गृहसजावटीच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत.बाजारात सागाच्या लाकडापासून तयार केलेल्या अशा वस्तूंची किंमत 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत असते; मात्र कारागृहाच्या या प्रदर्शनात त्या वस्तू अवघ्या बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व वस्तूंच्या आकारमानानुसार व तयार करण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे दर निश्चित करून त्यावर लेबल चिटकवण्यात आले आहेत. याशिवाय बेकरी विभागात ओट्स बिस्किट्स, नाचणी बिस्किट्स यांसह विविध पौष्टिक आणि चवदार खाद्यपदार्थ बनवले गेले आहेत. महिला व इतर बंद्यांनी अत्यंत सुबक पणत्या, पर्यावरणपूरक पिशव्या, रंगीबेरंगी आकाशदिवे (आकाश कंदील), पर्स, सुती कापडाचे व कॉटनचे प्रॉडक्ट्स, टॉवेल तसेच आकर्षक की-चेन आणि की-स्टँड यांसारख्या विविध भेटवस्तू बनवल्या आहेत. कारागृह प्रशासनाचा मुख्य उद्देश नफा मिळवणे नसून बंद्यांना प्रशिक्षित करणे आणि त्यांच्यात सकारात्मक मानसिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात सध्या सुमारे 3 हजार 500 बंदी कार्यरत आहेत. या कारागृहातील कारखाना विभागात सुमारे 100 बंदी, शिवणकाम व इतर विभागांत साधारण शंभराच्या आसपास बंदी, तर महिला विभागातील सुमारे 10 महिला बंद्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून या वस्तू बनवून घेतल्या जातात. बंद्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार नियमानुसार वेतन (वेजेस) दिले जाते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंद्यांनी स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करावा किंवा काम करून पैसे मिळवावेत आणि गुन्हेगारीकडे परत वळू नयेत, हा यामागे मूळ उद्देश आहे. जिल्हा नियोजन निधीतून कैद्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि उपकरणांच्या खरेदीसाठी आवश्यक ते साहाय्यही पुरवले जात आहे. हे विशेष प्रदर्शन दिवाळी होईपर्यंत सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. तसेच दिवाळी प्रदर्शनाव्यतिरिक्त कारागृहाच्या बाहेरील आऊटलेटमध्ये वर्षभर कोणालाही येऊन ऑर्डर देऊन खरेदी करता येऊ शकते. ठाण्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन बंद्यांच्या कलागुणांना, कौशल्याला आणि स्वावलंबनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कारागृहाच्या वतीने करण्यात आले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.