loader
Breaking News
Breaking News
Foto

नानांची घट्ट मिठी आणि शाबासकीची थाप आता आयुष्‍याचा ठेवा- गणेश धुरी

रत्नागिरी : लहानपणी आई असे पदार्थ बनवायची, आज हे पदार्थ खल्‍ल्‍यानंतर कोकणातील खास रेसिपींची आठवण तु दिलेल्‍या पदार्थ खाऊन झाली, अशी शाबासकीची थाप दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्‍या पाटीवर मारत, एकदम घट्ट मिठी मारली ते क्षण आपल्‍या आयुष्‍यातील अनमोल क्षण होते अशा भावना रत्‍नागिरीतील हॉटेल व्‍यावसायिक गणेश धुरी यांनी व्‍यक्‍त केली.गुरुवारची सकाळ आपल्‍यासाठी धक्‍कादायक होती. अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्‍या निधनाची अविश्‍वसनीय वृत्त कानावर आले. खुप मोठा धक्‍का बसला. दोन वर्षापूर्वी आपल्‍याकडील जेवण जेवल्‍यानंतर नानांनी मारलेल्‍या मिठीची आठवण झाली. राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍या उदयपर्व या कार्यक्रमासाठी रत्‍नागिरीत अभिनेते नाना पाटेकर दोन वर्षापूर्वी आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्‍यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्‍या जेवणाची व्‍यवस्‍था ना. सामंत यांनी आपल्‍यावर सोपवली होती. खास कोकणातील घराघरात मिळणार्‍या साध्‍या जेवणाचे पदार्थ सांगण्‍यात आले होते. नाना व माशेलकर सर या दोघांनी जेवणाचे कौतुक केले. नानांनी जेवण झाल्‍यानंतर हात धुवून आल्‍यावर आपल्‍याला थेट मिठी मारली आणि गणेश तुझ्‍यामुळे लहानपणी आईच्‍या हातचे पदार्थाची आज आठवण करुन दिलीस अशी शाबासकीची थापही त्‍यांनी पाठीवर मारली. हा ठेवा आता आयुष्‍यभर आपल्‍यासोबत राहणार असल्‍याच्‍या भावना गणेश धुरी यांनी व्‍यक्‍त केल्‍या. त्‍यावेळी नानांनी मुलगा मल्‍हारकडेही आपल्‍या जेवणाचे कौतुक केले होते. मल्‍हारच्‍या लग्‍नात अशा पध्‍दतीने कोकण पदार्थ ठेवायची आपली इच्‍छाही त्‍यांनी बोलून दाखवताना, तुम्‍ही याल का अशी विचारणाही नानांनी आपल्‍याकडे केली होती असे धुरी यांनी सांगितले.नानांची कौतुकाची थाप आपल्‍याला भविष्‍यातील वाटचालीत नेहमीच प्रेरणा देत राहील अशा भावना व्‍यक्‍त करतानाच त्‍यांना भावपूर्ण श्रध्‍दांजलीही त्‍यांनी अर्पण केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg