ठाणे (प्रतिनिधी) - ड्रग्ज तस्करी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून त्याच्याकडून ५९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. मुंब्रा परिसरातील अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी नायजेरियन दाम्पत्याला अटक केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी आणखी एका परदेशी नागरिक तपासादरम्यान पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या तिघांकडून आतापर्यंत दोन किलो १५७.५ ग्रॅम कोकेन आणि १०४.७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) असा एकूण १० कोटी ९३ लाख आठ हजार ७०० रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणे शहर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
बेतवडे येथील मॅरेथॉन नेक्सवर्ड सोसायटीत मुंब्रा पोलिस ठाण्याच्या एनडीपीएस पथकाला काही परदेशी नागरिक अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीतील सुमारे ६०० फ्लॅट्सची नियोजनबद्ध तपासणी केली. या शोधमोहिमेत ऑरा इमारतीत राहणाऱ्या चुकवुएमेका इमॅन्युएल न्वांक्वो (४१) आणि युकेरिया चुकवुएमेका ओबियानुजु (४१) या नायजेरियन दाम्पत्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आले. याप्रकरणी १४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान दाम्पत्याने अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीत उस्मान बुआरी अली हा मूळ रा. सेनेगल याचाही सहभाग असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत ५९ ग्रॅम कोकेन आढळले. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींपैकी दोघांविरोधात यापूर्वी मुंबई आणि नवी मुंबई येथेही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींचे पासपोर्ट, भारतातील वास्तव्य आणि अन्य गुन्ह्यांतील सहभाग याबाबत पोलिस तपास करत आहेत. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस उपायुक्त पाटील यांनी सांगितले. मुंब्रा एनडीपीएस पथकाने २०२६ या वर्षात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ४२ आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून, त्यामध्ये सात परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या कारवायांमध्ये सुमारे ४३ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी गांजा व अन्य अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ६८७ जणांविरोधात, तर सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या ९८० जणांविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.