loader
Breaking News
Breaking News
Foto

कासमध्ये ओंकार हत्तीचा धुडगूस; ट्रॅक्टरसह ओमनीचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) - कास गावातील राणेवाडी येथे ओंकार हत्तीने शुक्रवारी रात्री धुडगूस घालत वाहनांचे नुकसान केले. शांताराम रामचंद्र राणे यांच्या ट्रॅक्टरचे, तर गोविंद पेडणेकर यांच्या पडवीत उभ्या केलेल्या ओमनी कारचे हत्तीने नुकसान केले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओंकार हत्तीने रात्रीच्या वेळी वस्तीत प्रवेश करून वाहनांचे नुकसान केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हत्तीचा वावर मानवी वस्तीत वाढत असताना वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन हत्तीचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळवून द्यावी. अन्यथा वनविभागाविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत नुकसानग्रस्त वाहनांचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाचा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. वनविभागाला कळविल्यानंतर आज येतो, उद्या येतो अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत मिळणार कधी, असा सवाल सरपंच प्रवीण पंडित यांनी उपस्थित केला आहे. हत्तीने शुक्रवारी रात्री 8 वाजता बागकर यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी घरातील महिला भयभीत झाली. लोकांनी सांगितले तरच समजते की हत्ती या ठिकाणी आहे. त्यामुळे लोकांच्या फोनची वाट पाहत बसणार काय? कोणतीही अनुचित घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय, असा सवाल प्रवीण पंडित यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg