खेड (प्रतिनिधी) - मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासोबतच कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक अडचणी समजून घेण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गाववस्ती दौऱ्याचे नियोजन केले आहे. या दौऱ्याची सुरुवात येत्या २१ ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील आंबवली गावातून होणार असून, २१ आणि २२ ऑक्टोबर असे दोन दिवस ते या गावात उपस्थित राहणार आहेत. या काळात एका रात्रीचा मुक्काम करून कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. आपल्या मतदारसंघातील एखाद्या गावाची निवड करून महिन्यातून एक किंवा दोन दिवस त्या गावात मुक्काम करण्याचा मानस मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.
विकासकामे आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी आपले नाते जोडले गेले असले, तरी त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात काय सुरू आहे, त्यांना कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेणेही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले. गावात मुक्काम करताना तेथील ग्रामस्थांचे राहणीमान, जीवनशैली आणि दैनंदिन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित पंचायत समिती गटातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आढावा बैठक घेतली जाईल.
या बैठकीत विकासकामांच्या अंमलबजावणीतील अडचणी, प्रशासकीय पातळीवरील प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक गरजांचा आढावा घेतला जाणार आहे. सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन हे जनतेच्या जीवनात किती सकारात्मक बदल घडले, यावरून झाले पाहिजे, असे मत व्यक्त करत योगेश कदम म्हणाले की, गावातील नागरिकांचे जीवनमान समजून घेतल्याशिवाय त्यांच्या समस्या आणि अपेक्षा योग्य प्रकारे जाणून घेता येणार नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष गावात राहून नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठक घेणे, हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.