loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीत CJP आंदोलनाआधीच राडा.. तिरंगा रॅलीसाठी निघालेल्या अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नवी दिल्ली. सीजेपीच्या 'लहरा दो तिरंगा' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठा राडा झाल्याचं दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रेसाठी निघालेल्या अभिजीत दीपकेला ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे कि यासाठी दीपके व इतर सीजेपी कार्यकर्त्यांना पोलिसांनी परवानगी दिली नव्हती.माहितीनुसार, दीपके जसे आपल्या घरातून बाहेर पडले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावर दीपके यांनी पोलिसांना विचारले कि तुम्ही मला का ताब्यात घेत आहात? तेव्हा पोलिसांनी सांगितले कि प्रिव्हेंटिव्ह मेजर अंतर्गत तुम्हाला अटक करत आहोत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तेव्हा अभिजीतने विचारले कि मी कोणताही कायदा तोडत नाहीये आणि एकटा जात आहे मग तुम्ही मला का घेऊन जात आहात. तर पोलिसांनी सांगितले कि तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. यावर पोलिसांनी म्हटले, मी तर तिथे जातच नाहीये. तुम्ही सांगून द्या कुठे जायचे आहे.त्या आधी दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आंदोलन न करण्याबाबत नोटीस दिली होती. त्यानंतर आंदोलन स्थळी जाताना दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानं वातावरण चांगलंच तापलं आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg