loader
Breaking News
Breaking News
Foto

मिर्याबांदा येथील किल्ला बनविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण (प्रतिनिधी) - मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि ऐतिहासिक वारशाविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने बलभीम भजन मंडळ, मिर्यांबांदा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ला बनविणे स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत गावातील मुलांच्या एकूण चार गटांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. या स्पर्धेत सहभागी बालचमूंनी आपल्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून सिंधुदुर्ग, प्रतापगड, पद्मदुर्ग आदी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, या स्पर्धेचे परीक्षण केवळ किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या आकर्षकतेवर आधारित न ठेवता किल्ल्याचा इतिहास, त्यासंबंधीची माहिती, माहितीचे प्रभावी सादरीकरण तसेच परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पर्धकांनी दिलेली उत्तरे अशा विविध निकषांच्या आधारे करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शैलेश खांडाळेकर, स्वप्नील पराडकर आणि रोहिदास खराडे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक यामध्ये युवराज दत्तात्रय मुंबरकर, रियान दत्तात्रय मुंबरकर आणि इशान महादेव आडकर यांनी साकारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीस मिळाला. द्वितीय क्रमांक मुद्रा महेश पराडकर, स्वराज स्वप्नील केळुसकर आणि श्रीकृष्ण ज्ञानेश्वर पराडकर यांनी साकारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीस मिळाला.

टाईम्स स्पेशल

तृतीय क्रमांक सिमीत नारायण आडकर, विदित नारायण आडकर, जियांश सुबोध आडकर आणि नील दीपक जामसंडेकर यांनी साकारलेल्या प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृतीस मिळाला. तर उत्तेजनार्थ क्रमांक श्लोक अवधूत आडकर, आर्या अवधूत आडकर आणि ओवी युवराज आडकर यांनी साकारलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीस मिळाला. दरम्यान, या उपक्रमात चार गटांनी सहभाग घेतला असला तरी भविष्यात अशा स्पर्धांना गावातील अधिकाधिक मुलांचा सहभाग लाभावा, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धक, त्यांचे पालक, परीक्षक आणि उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे बलभीम भजन मंडळाने अभिनंदन करून आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg