loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श हायस्कूल कुरतडेच्या ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

रत्नागिरी : जमीर खलफे - आदर्श हायस्कूल कुरतडेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत शाळेच्या सहाही खेळाडूंनी सुवर्णपदके पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१४ वर्षाखालील विभागात खंडेराव पाटील याची ५० किलो गट, समर्थ कुदळे याची ५४ किलो गट तर १७ वर्षे वर्षाखालील विभागात अनुराधा गांजवे याची ५० किलो गट, अथर्व घाडगे याची ५४ किलो गट, अविष्कार चौगुले याची ६४ किलो गट याशिवाय ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात रुद्र फुटक याची ४८ किलो गट यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.

टाइम्स स्पेशल

या सर्व यशस्वी खेळाडूंना मानसिंग कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष ज्योती आंबर्डेकर, मीनाताई आंबर्डेकर आणि शाळेचे मुख्याध्यापक मांडवकर यांनी सर्व विजेत्या मल्लांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले असून, पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg