loader
Breaking News
Breaking News
Foto

निवसर येथे आंबा-काजू बागेत रानगव्याचा मृत्यू, वनविभागाकडून घटनास्थळी जाऊन तात्काळ कार्यवाही

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील मौजे निवसर (शिवार भाटले) येथे भरत रामचंद्र झाडवे यांच्या आंबा-काजू बागेमध्ये एका रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र रानगव्याच्या मृत्युचे कारण समजू शकले नाही. निवसर येथे भरत रामचंद्र झाडवे यांच्या आंबा- काजूच्या बागेत रागावण्याचा मृत्यू झाल्याची माहिती गावचे पोलीस पाटील दत्ताराम शांताराम मेस्त्री यांनी दूरध्वनीद्वारे लांजाचे वनपाल धुळू कोळेकर यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृत रानगवा अंदाजे १० ते १२ वर्षे वयाचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लांजा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनुसे यांच्यामार्फत मृत रानगव्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कारवाईदरम्यान विवेक कांबळे, सागर तारी, शरद शिंदे, प्रशांत शिंदे, गावचे पोलीस पाटील दत्ताराम मेस्त्री यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी विक्रम गुरव, परिमंडळ वन अधिकारी धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे व श्रावणी पवार तसेच जलद बचाव पथक लांजाचे सदस्य अमित लांजेकर यांनी सहभाग घेतला. सदर कारवाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मात्र रानगव्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg