loader
Breaking News
Breaking News
Foto

दुष्काळाच्या झळा रोखण्यासाठी लोवलेकरांचा पुढाकार; १० विजय बंधाऱ्यांतून जलसाठा वाढविण्याचे प्रयत्न!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी लोवले येथे जलसंधारणाच्या कामांना चालना देण्यात आली आहे. पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने ‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत देवाचा पऱ्या आणि थोरला पऱ्या येथे तब्बल १० विजय बंधारे उभारण्यात येत आहेत. ग्रामपंचायत आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत राबविलेल्या या उपक्रमातून जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोवले ग्रामपंचायत, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे नवनिर्माण महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या जलसंधारणाच्या कामात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर पाण्याचा साठा निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यावर या उपक्रमातून भर देण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग पुढील काळात व्हावा, हा विजय बंधारे उभारण्यामागील महत्त्वाचा हेतू आहे. या बंधाऱ्यांमुळे पाण्याचा स्थानिक साठा वाढण्यास, भूजल पुनर्भरणास आणि परिसरातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे नियोजन आणि जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असताना लोवले येथे सुरू असलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg